Friday, January 5, 2024

ज्येष्ठ नगरसेवक नरसिंग नाईकवाडे यांचा मा.मंत्री जयदत्त आण्णा क्षीरसागर गटात जाहीर प्रवेश.

बीड (प्रतिनिधी) शहरातील ज्येष्ठ नगरसेवक नरसिंग नाईकवाडे आणि त्यांच्या मुलांनी गुरूवार दि.4 रोजी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या गटात जाहीर प्रवेश केला असून माजी मंत्री क्षीरसागर यांनी सर्वांचे स्वागत केले आहे. माजी मंत्री क्षीरसागर यांच्या बरोबर राहून पुढील वाटचाल करणार असल्याचे नाईकवाडे म्हणाले.
बीड शहरातील ज्येष्ठ नगरसेवक म्हणून ओळखले जाणारे नरसिंग नाईकवाडे तसेच राष्ट्रवादी युवा काँग्रेसचे उपजिल्हाप्रमुख शैलेश नाईकवाडे, राहुल नाईकवाडे, अजय नाईकवाडे यांनी गुरूवारी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या गटात प्रवेश केला आहे. 1993-94 पासून सक्रिय राजकारणात असलेले नरसिंग नाईकवाडे तीन वेळा स्वतः नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत तर दोन वेळा त्यांच्या पत्नी सुशिलाताई नाईकवाडे नगरसेविका म्हणून प्रभाग क्रमांक 23 मधून निवडून आल्या आहेत. बीडच्या राजकारणात ज्येष्ठ आणि हजारो मतदार पाठीशी असणारे नगरसेवक म्हणून त्यांची ओळख आहे. यापूर्वीही ते माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्याबरोबरच काम करत होते मात्र मध्यंतराच्या काळात त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता मात्र दि.04 रोजी माजी मंत्री क्षीरसागर हेच आपले नेतृत्व असून त्यांच्याबरोबरच आपण काम करणार असल्याचे सांगत त्यांनी   जाहीर प्रवेश केला आहे यावेळी नगरसेवक मुखींद लाला, शेख जमील भाई, वाजेद कुरेशी, शिवाजी जाधव, मोईन मौलाना, मनोज मस्के, प्रवीण सुरवसे, अ‍ॅड. शेख खाजा, संतोष पवार, सुलेमान पठाण, नवाज खान, शेख इम्रान आदी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment