*स्व.बाळासाहेब ठाकरे जयंती; भगव्या ध्वजाचे ध्वजारोहन व नवीन एलईडीचे अनावरण.
परळी वैजनाथ (प्रतिनिधी) अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्राचे मंदिर व्हावे ही करोडे हिंदुवासियांसोबतच हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. ते आज खर्या अर्थाने पूर्ण झाले असून हे महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांसाठी अभिमानाची बाब असल्याचे सांगून शिवसैनिकांनी शिवसेनाप्रमुख हिंदुहृदयसम्राट स्व. मा बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेली समाजसेवा करावी अशी समाज सेवा केली तरच खर्या अर्थाने शिवसेनाप्रमुखांची जयंती साजरी केली असे होईल असे प्रतिपादन परळीचे माजी नगराध्यक्ष अभयकुमार पप्पू ठक्कर यांनी केले. दरम्यान आज मंगळवार दिनरांक 23 जानेवारी रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे चौकाचे सुशोभीकरण व नवीन फलक व भगव्या ध्वजाचे ध्वजाचे ध्वजारोहन करून नविन एलईडीचे अनावरण अभय कुमार ठक्कर यांच्या हस्ते करण्यात आले.
हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त दि. 23 जानेवारी रोजी परळी वैजनाथ येथे सकाळी 11 वाजता शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे चौकात भगव्या ध्वजाचे ध्वजारोहण व प्रतिमेचे पूजन अभयकुमार ठक्कर यांच्या हस्ते करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.अतुल दुबे, संजय कुकडे, मोहन परदेशी सतीश जगताप प्रकाश सूर्यकर राजेश साबणे बाळासाहेब कडबाने ज्ञानोबा सुरवसे गोपाळ आंधळे स्वानंद पाटील राजा भैय्या पांडे वैजनाथ कळसकर दिलीप जोशी महेश विरधे बालाजी ढगे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना माजी नगराध्यक्ष अभयकुमार पप्पू ठक्कर बोलत होते. पुढे ते म्हणाले की, मराठी माणसाच्या न्याय्य हक्कासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आयुष्यभर लढत राहिले. मराठी माणसांना न्याय मिळावा, यासाठी त्यांनी अनेक मुद्द्यांना वाचा फोडली. तसंच, ज्वलंत हिंदूत्वाचा त्यांनी कायम पुरस्कार केला. अंगावर भगवा कुर्ता, भगवी लुंगी, गळ्यात रुद्राक्षाच्या माळा, आणि सर्वांच्या लक्षात राहीला तो ठाकरी आवाज, हे खरं त्यांच चित्र होतं. त्यांच्या बोलण्यात जो ठाकरी बाणा होता तोच बाणा त्यांच्या जगण्यात आणि वागण्यात अखेरपर्यंत राहीला. बाळासाहेबांच वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी घेतलेली भूमिका कधी फिरविली नाही. आपल्या भूमिकेवर कायम ठाम राहणं, हा त्यांचा महत्वाचा पैलू. ते बोलतानाचं म्हणायचे,माझे शब्द म्हणजे बंदुकीतली गोळी आहे. एकदा सुटली की सुटली. पुन्हा पाहायचं नाही कुठे पडली अन् कुणाला लागली. असा एकंदरीत त्यांचा ठाकरी बाणा होता. शिवसेनाप्रमुख मा बाळासाहेब ठाकरेंनी मुळातच गोरगरिबांची सर्वसामान्यांची समाजसेवा करणे आणि तमाम हिंदू बांधवांचे संरक्षण करणे ह्याच कार्यासाठी शिवसेना पक्षाची स्थापना केली आणि तमाम शिवसैनिकांना 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण असा संदेश दिला आणी ह्या संदेशाच्या आधारावरच महाराष्ट्रात शिवसेना नावाच्या पक्षाचे वटवृक्ष झाले आणि शिवसेनाप्रमुख मा बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व प्रेरणेनेच आमच्यासारखे शिवसैनिक तयार झाले. तेव्हा शिवसैनिकांनी आपणा स्वतःस समाजकार्यात वाहून घेत गोरगरिबांची आणि सर्वसामान्यांची सेवा करून त्यांच्या आडी अडचणीत मदत करावी जेणेकरून शिवसेनाप्रमुख मा बाळासाहेब ठाकरे यांचा खर्या अर्थाने शिवसेना पक्ष स्थापण्याचा उद्देश सफल होईल व शिवसेना पक्षप्रमुख मा.उद्धव ठाकरे साहेबांचेही हात बळकट होतील असेही उपजिल्हाप्रमुख अभयकुमार पप्पू ठक्कर म्हणाले.
यावेळी जय भवानी, जय शिवाजी, अमर रहे, अमर रहे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे अमर रहे, तुमचं आमचं नातं काय, जय भवानी जय शिवराय, आवाज कुणाचा शिवसेनेचा, आ...ब.. बं काय झाली गोष्ट जय महाराष्ट्र अशा गगनभेदी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी युवा सेना परळी विधानसभा प्रमुख मोहन परदेशी, शिवसेना तळ विभाग प्रमुख श्रीनिवास सावजी, शिवाजीनगर युवा प्रमुख सुरेश परदेशी, छत्रपती शिवाजी महाराज चौक विभाग प्रमुख संजय सोमाणे, उप शहर प्रमुख किशन बुंदेले, बबन ढेंबरे, अमित कचरे,सचिन लोढा, बजरंग औटी,मनिष जोशी,लक्ष्मण मुंडे,योगेश घेवारे,विजय पवार,माऊली मुंडे, नरेश मैड,योगेश जाधव, प्रकाश देवकर, जगन्नाथ तुपसौंदर, सोमनाथ गायकवाड, पंकज पांचाळ, संस्कार पालीमकर, आकाश जाधव, जगदीश पवार, विकास देवकर, सुधाकर बारसकार यांनी प्रयत्न केले.
*या कारसेवकांचा केला सन्मान*
दिलीपराव दीक्षित
मोहन राव तंवर
सत्यनारायण दीडवाणी
राम ओझा
सतीश गडगुळ
प्रभाकर वेरूळे
प्रकाश आवके
राजाभाऊ दहिवाळ
संजय कुकडे
राजेश्वर देशमुख
शांताबाई टाक
रमेश गायकवाड
वैजनाथ राव कराड
अर्जुनराव टेलर
नरेश पिंपळे
No comments:
Post a Comment