Thursday, January 11, 2024

अवैध वाळू उपसा करताना तरुण गोदावरी नदीपात्रात बुडाला, शोध कार्य सुरू.


गेवराई (प्रतिनिधी) : अवैध वाळू उपसा करताना केणीवर काम करणारा अंबड तालुक्यातील ३० वर्षाय तरूण सावळेश्वर येथील गोदावरी नदी पात्रात बुडल्याची धक्कादायक घटना बुधवारी मध्यरात्री घडली. शेख नबी शेख खबीब असे तरुणाचे नाव आहे. आज सकाळपासून नदी पात्रात त्याचा शोध सुरू आहे.

शेख नबी शेख खबीब हा अंबड तालुक्यातील ताडहातगाव येथील रहिवासी आहे. सावळेश्वर येथील गोदावरी पात्रात अवैध वाळू उपसा सुरू आहे. या ठिकाणी बुधवारी मध्यरात्री हा तरुण केणीद्वारे वाळू उपसा करण्याचे काम करत होता. अचानक तो नदी पात्रात बुडाला. आज सकाळी माहिती मिळताच गेवराई पोलिस घटनास्थळी पोहचल. अद्याप तरुणाचा शोध लागला नाही.

No comments:

Post a Comment