Thursday, January 4, 2024

थकीत वेतनासाठी रुग्णवाहिका चालकांचे अंदोलन. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण.




बीड (प्रतिनिधी) रूग्ण वाहिकांवर चालक म्हणुन काम करणार्‍या कामगारांचे 9 महिन्यांचे वेतन थकीत राहिले आहे. वेतना अभावी त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. वेतना संदर्भात त्यांनी अनेक वेळा संबंधित विभागाकडे तगादा लावला मात्र त्यांना वेतन देण्यात आले नाही. आज सर्व चालक वेतनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत.

जिल्ह्यामध्ये जि.प अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रात चालक कार्यरत आहेत. हे चालक कंत्राटी बेसवर असुन त्यांचा 9 महिन्याचा पगार थकलेला आहे. पगारासाठी त्यांनी अनेक वेळा विनवनी केली. मात्र याची दखल संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांनी घेतली नाही. 9 महिन्याचा पगार द्यावा.या मागणीसाठी हे चालक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत.यावेळी झोडगे डी.डी, सय्यद निसार यांच्यासह आदींचा सहभाग आहे.

No comments:

Post a Comment