पावसाळा संपल्यानंतर सुरुवातीच्या काही दिवसात थंडी जाणवली नाही. त्यानंतर काही दिवसांनी थंडीची लाट आली. तर मागील आठवडाभरापासून ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. अशा बदलत्या वातावरणामुळे सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण वाढले आहेत. घरोघरी सर्दी, खोकला सारख्या आजाराचे रुग्ण दिसत आहेत. त्यामुळं जिल्हा रुग्णालयासह उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच खाजगी रुग्णालयात उपचार घेण्यासाठी रुग्णाची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे.
आरोग्य विभागाचे आवाहन
सतत बदलत असलेल्या हवामानामुळे नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम दिसून येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी उकळून पाणी प्यावे, वाफ घ्यावी असं आवाहन आरोग्य विभाकडून केलं जात आहे. तसेच जास्त त्रास जाणवल्यास डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन केले आहे.
No comments:
Post a Comment