Friday, August 25, 2023

संभाजी ब्रिगेड व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मागणीला यश.न.प. प्रशासनाने डास निर्मूलनासाठी फॉगिंग मशीनद्वारे सुरु केली औषध फवारणी.

 

परळी वैजनाथ (प्रतिनिधी)  शहरातील नागरी वस्तीमध्ये डासांचा वाढता प्रभाव पाहता परळी नगरपरिषदेने शहरातील डास निर्मूलन करण्यासाठी औषध फवारणी करावी अशी मागणी संभाजी ब्रिगेड व मनसे च्या वतीने दोन दिवसांपूर्वी करण्यात आली होती. या मागणीस यश मिळाले असून परळी नगर परिषद प्रशासनाने या निवेदनाची दखल घेत तात्काळ औषध फवारणी करण्यास सुरुवात केली आहे.

डासांचा समूळ नायनाट करण्याची  उपाययोजना करण्याच्या कामी आधुनिक पद्धतीच्या नवीन ३० मशीन आजपासून शहरातील डास निर्मूलनासाठी प्रत्यक्षात कार्यान्वीत केल्या आहेत.
नगर परिषदेच्या या तत्परते बद्दल संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष सेवकराम जाधव, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष वैजनाथ कळसकर, संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष पांडुरंग मोरे यांच्यासह नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

No comments:

Post a Comment