बीड शहरासह माजलगाव तालुक्याची तहान भागवणाऱ्या माजलगाव धरणात जून महिन्यात 23 टक्के पाणीसाठा होता. मात्र आजघडीला हा पाणीसाठी 7 टक्क्यांनी कमी झाला आहे.
सध्या माजलगाव धरणाचा पाणीसाठा 16 टक्क्यांवर आला आहे. या महिन्यात दमदार पाऊस झाला नाही तर बीड जिल्ह्यावर पाणी संकट ओढावण्याची शक्यता आहे. नागरिकांनी देखील पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक बनले आहे.
No comments:
Post a Comment