Friday, August 25, 2023

७० हजाराची लाच घेताना लाचखोर एसीबीच्या जाळ्यात!


गेवराई (प्रतिनिधी) बीड शहरातील शिवाजी नगर ठाण्यातील लाचेचे प्रकरण ताजे असताना, गेवराईत परत ७०,००० हजाराची लाच घेताना एका लिपिकास ताब्यात घेतले. जिल्ह्यात लाचेच्या  घटना वाढल्याने, जिल्ह्यातील किती अनागोंदी कारभार सुरुय हे लक्षात येते.

संत रोहिदास महिला अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड खळेगाव तालुका गेवराई जिल्हा बीड या संस्थेची सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालय गेवराई येथे नोंद करण्याकरिता 75 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती,  तडजोडी अंती 70 हजार रुपये देण्याचे ठरले. आज दिनांक 24 ऑगस्ट 2023 रोजी 70 हजार रुपये लाच स्वीकारताना शिक्षक कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित गेवराईचा लिपिक राजाभाऊ शिंदे याला बीड एसीबीने ताब्यात घेतले. या प्रकरणी गेवराई पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. हि कारवाई बीड एसीबीने केली.

No comments:

Post a Comment