केज (प्रतिनिधी) वसंत माध्यामिक व उच्च माध्यमिक महाविघालय येथे तहसीलदार अभिजित जगताप साहेब यांच्या हस्ते युवा संवाद महसुल सप्ताह संपन्न झाला . या कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबुरावजी वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.माधवराव फावडे, वसंत कनिष्ठ विद्यालयाचे प्राचार्य प्रकाश धेंडे हे होते. व्यासपीठावर प्रा.गणेश चाळक, प्रा.पारिख हे उपस्थित हो

तहसीलदार जगताप साहेब यांनी प्रशासनाच्या योजना जन सामान्या पर्यंत पोंहचन्यासाठी सक्षम प्रशासकिय आधिकाऱ्याची आवशकता असते हे सांगीतले. महसुल योजनेचे काम कसे चाललते ,हे समजावून सांगीतले . जिल्हा परिषद पंचायत समिती तहसिल कार्यालय व नगरपालिका नगर परिषद यांचे काम कसे चालते हे सांगीतले . तसेच तहसील कार्यालया कडून मिळणारे वेगवेगळे प्रमाणपञ कसे काढायाचे याची ही माहिती दिली . महा ई सेवा त्यांचे आधिकार सांगुन स्मार्ट फोनच्या माध्यमातून सर्व प्रमाणपत्रे कसे मिळतात हे सांगीतले.स्पर्धा परीक्षाचे महत्व सागुन विद्यार्थ्यांशी संवाद साधला . विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त सहभाग घेतला .
या कार्यक्रमाचे आभार प्रा. समुद्रे सर यांनी मानले तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. चव्हाण सर प्रा. पारिख सर प्रा. ,चाळक प्रा. धपाटे, प्रा.सोळंके प्रा.साबळे सर, प्रा साखरे प्रा.लोंढे , प्रा.देशमुख यांनी प्रयत्न केले .
No comments:
Post a Comment