मुळे रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या खड्ड्यात ही बस पलटी झाली. या अपघातात ४ विद्यार्थी जखमी झाले आहेत.
अपघात झालेली सदरील बस बीडच्या चौसाळा गावातील गुरुमहाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित गुरुदत्त माध्यमिक व उच्च्य माध्यमिक विद्यालयाची आहे. शनिवारी शाळा सुटल्यानंतर बस विध्यार्थ्यांना घरी सोडण्यासाठी मार्गस्थ झाली होती. परंतु चोसाळा परिसरात बस रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात पलटी झाली. चालकाच्या निष्काळजीमुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.
पालकांची धाव
दरम्यान सादर बस अपघातात ४ विद्यार्थी जखमी झाले असून त्या जखमी विद्यार्थ्यांवर चौसाळा गावातील खाजगी आणि शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. अपघात झाल्याची माहिती समजल्यानंतर पालकांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली.
No comments:
Post a Comment