बीड शहरातील पोलीस मुख्यालय परिसरात असलेल्या गोदामात गॅसच्या रिकाम्या ठेवलेल्या ५१६ टाक्यापैकी ५७ टाक्या अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्या. या टाक्यांची किंमत १ लाख ८९ हजार २२९ रुपये एवढी आहे. यावेळी मुख्यालयात असलेले नामदेव हरीभाऊ अजबे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार ३ ते ४ ऑगस्ट दरम्यान पोलीस मुख्यालयातील मेन व गोदामाचे लोखंडी गेट तोडून चोरी केली आहे.
पोलिसांना आव्हान
दरम्यान चोरी होऊ नये यासाठी काळजी घेण्याचे डोस पाजणारे पोलीस दलाच्या मुख्यालयातील ५७ गॅस टाक्या चोरांनी लंपास करून थेट पोलीस प्रशासनालाच आव्हान दिल्याने खळबळ उडाली आहे.
No comments:
Post a Comment