Sunday, August 13, 2023

धक्कादायक घटना ! घरात सुरु होती चिमुकल्याच्या वाढदिवसाची तयारी.इकडे पित्याचे धक्कादायक कृत्य.

धारुर (प्रतिनिधी) : घरात आपल्या चिमुकल्या मुलाच्या वाढदिवसाची तयारी सुरू होती. घरातील इतर मंडळी तयारी करत असतांना पित्याने मात्र गळफास घेत आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना बीडच्या धारूर शहरात उघडकीस आली आहे.
 धारूर शहरातील जाधव गल्लीतील राहुल माने (वय २७) असं आत्महत्या केलेल्या पित्याचे नाव आहे. मयत राहुल माने याचे धारूर शहरात दुकान होते. त्याने आपल्या राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. विशेष म्हणजे मयत राहुल याच्या ३ वर्षीय मुलाचा वाढदिवस होता. वाढदिवस साजरा करण्याची पूर्ण तयारी झालेली असताना त्यानी हे टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. 

आत्महत्येचे कारण अस्पष्ट 

सदर घटनेची माहिती मिळताच धारूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. दरम्यान मयत राहुल याने आत्महत्या का केली? हे अद्याप स्पष्ट झालं नसून याप्रकरणी धारूर पोलीस ठाण्यात मृत्यूची आकस्मिक नोंद करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment