माजलगाव (प्रतिनिधी) वाघोरा येथील मैत्री प्रतिष्ठानाच्या वतीने स्वातंत्र्यदिन जि. प. शाळा वाघोरा, दर्गा, तांडा व झोपडपट्टी वस्ती शाळेमध्ये गुणवंतांचा गुणगौरव करून साजरा करण्यात आला.
मैत्री प्रतिष्ठानच्या वतीने वाघोरा येथील जि. प. शाळेमध्ये मधुकर बादाडे यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याध्यापक बादल डेगल पीएसआय विजय कोंडीबा लोंढे इंजि. माने वसंत गोरे वचिष्ट गायकवाड भारत शिंदे अरुण बादाडे बादाडे गुरुजी यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना प्रतिष्ठानच्यावतीने प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी केशव बादाडे, राहुल खुणे, जाधव सर, कुलकर्णी सर, श्रीगोंदेकर सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाची सूत्रसंचालन कु. दीप्ती गोरे यांनी केले तर आभार बादाडे गुरुजी यांनी मानले.
वाघोरा तांडा येथे जि. प. शाळेचे मुख्याध्यापक गड्डापोड यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख पाहुणे प्रा.भानुदास जाधव,सुरेश आडे ग्रा. स.श्रीराम राठोड यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रतिष्ठानच्या वतीने प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
वाघोरा झोपडपट्टी वस्ती शाळेमध्ये दिलीप गोरे सर यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख पाहुणे माने, शिरसाट, मोरे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.
वाघोरा दर्गातील जि. प. उर्दू शाळेमध्ये ग्रा.प. बाबु भाई यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
मैत्री प्रतिष्ठानच्या या स्तुत्य उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहेत तर पालकांमधून प्रतिष्ठानचे सदस्य प्रा. डॉ. गजानन सवने, प्रा. भानुदास जाधव,विजयकुमार कटारे,वसंत गोरे, भारत शिंदे, वचिष्ट गायकवाड यांचे आभार मानून पुढील कार्यासाठी शुभेच्छा देत आहेत.
No comments:
Post a Comment