परळी वैजनाथ (प्रतिनिधी) : या वर्षी मुबलक पाऊस झालेला असतांना सुद्धा परळी नगरपालिकेच्या भोंगळ कारभारा मुळे नागरीकांना पाणी मिळत नसून मोटार खराब झाल्याने बंद पडलेले बोअरवेल न न .प .प्रशासनाने तात्काळ दुरुस्त करावे असे आवाहन भाजपा नगरसेवक प्रा पवन मुंडे यांनी केले आहे.
शहरात अनेक ठिकाणी उन्हाळ्याची चाहूल लागण्या अगोदरच म्हणजे अत्ता पासूनच पाण्यासाठी वनवन फिरायची वेळ नागरिकांवर येत असून शहरात गल्लो-गल्लीत नागरिकांना पाण्यासाठी घेण्यात आलेले बोअरवेल बंद आहेत तसेच काही ठिकाणी बोअरवेल ला नवीन मोटार टाकण्याची आवश्यकता आहे मात्र त्याला न प प्रशासन बोअरवेल मोटारी दुरुस्ती करायला व नविन मोटार खरेदी करायला बजेट नसल्याचे कारण सांगत नवीन मोटार व दुरुस्ती साठी टाळाटाळ करत असल्याचा प्रकार समोर येत असून, शहरातील सर्वच भागातील बंद असलेले बोअरवेल तात्काळ चालू करून नागरिकांची पाण्यासाठी ची भटकंती थांबवावी असे आवाहन नगरसेवक प्रा पवन मुंडे यांनी न.प.प्रशासनाला केले आहे.
No comments:
Post a Comment