परळी वैजनाथ (वार्ताहार) साकूड (अंबाजोगाई) येथील रहिवासी व परळी येथील कै.लक्ष्मीबाई देशमुख महिल महाविद्यालयातील प्रा. सुलोचना निवृत्ती चाटे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने 'लोकप्रशासनʼ विषयात पीएच.डी. प्रदान केली. औरंगाबाद येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर कला व वाणिज्य महाविद्यालयातील प्रोफेसर डॉ.विनायक खिल्लारे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी "पंचायतराज संस्थांच्या सक्षमीकरणात ग्रामसभांचे योगदान : विशेष संदर्भ बीड जिल्हा" या विषयावर विद्यापीठास शोधप्रबंध सादर केला होता. त्यास विद्यापीठाने मान्यता देवून त्यांना पीएच.डी.पदवी बहाल करण्यात आली. या यशाबद्दल त्यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ, प्रोफेसर डॉ.एम. सी .पवार ,संस्थेचे अध्यक्ष श्री संजय देशमुख ,सचिव श्री रवींद्र देशमुख, कोषाध्यक्ष श्री प्रसाद देशमुख, प्राचार्य डॉ. लक्ष्मण मुंडे, प्रा. के आर बंग,प्राचार्य वसंत सानप, प्राचार्य बी डी मुंडे ,डॉ.दयासागर मस्के, डॉ.भगवान सांगळे, प्रा. राजकुमार चाटे , डॉ.नाथराव घरजाळे ,डॉ.श्रीहरी गुट्टे ,डॉ.एल आर मुंडे ,शिवाजी चाटे ,बाळू चाटे आदींनी त्यांचे अभिनंदन केले.
No comments:
Post a Comment