Wednesday, March 16, 2022

पवनराजे निधी बँकेच्या संचालक पदी विनायकजी राठोड आणि अजयजी जोशी यांची निवड .

परळी वैजनाथ (प्रतिनिधी ) आज पवनराजे निधी बँकेच्या कार्यालयात परळी शहरातील राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते मा.बाळासाहेबजी देशमुख यांच्या हस्ते स्विकृत संचालक म्हणून विनायक राठोड, व क्रीडाशिक्षक अजयजी जोशी यांंची नेमणुक केल्याचे पत्र पवनराजेचे अध्यक्ष प्रल्हाद सावंत, यांच्या उपस्थितीत देण्यात आले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बँकेचे उपाध्यक्ष बालासाहेब हंगरगे यांनी केले. या कार्यक्रम प्रसंगी मा.बाळासाहेब देशमुख यांनी आपले मत व्यक्त करतांना सांगितले की,पवनराजे बँक नावाप्रमाणेच नावरुपास येईल. या वेळी सत्कार मुर्ती विनायक राठोड व अजयजी जोशी यांनी संचालक पदी नियुक्ती केल्या बदल आभार मानले व संस्थेच्या कार्यामध्ये आमचे योगदान देता येईल असे सांगितले .अध्यक्षीय समारोपात अध्यक्ष यांनी संस्थेची माहिती दिली .या कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे सचिव गोविंद भरबडे,सहसचिव प्रल्हाद काळे ,मा.श्रीकांतजी ढेले,मुख्यध्याक  नांदुरकर सर ,हर्षवर्धन देशमुख, कार्यालयीन कर्मचारी सोमनाथ चाटे, सत्यप्रकाश कराड,प्रभाकर गित्ते आदी या वेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment