कोकणात गणेशत्सोव किंवा होळी या महत्वाच्या सणाला रेल्वे तसेच एसटीचे रिर्झवेशन आधीच बुक केले जाते. एेन सीझनवेळी खासगी बसेसे जादाचे भाडे आकारतात. राज्य सरकारने अवास्तव भाडे आकारण्यावर थेट कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. जर तुमच्याकडून अवास्तव भाडे कोणी आकरत असेल तुम्ही यासंदर्भात माहिती शासनाला कळवू शकता असेही परिवहन मंत्र्यांनी सांगितले आहे. याशिवाय प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून जादाच्या बसेसही मुंबईहून सोडण्यात येणार आहेत.
कोकणात होळी आणि गणपती हे दोन सण पारंपारिक पद्धतीने साजरे केले जातात. होळी आणि गणपतीला कोकणात जाण्यासाठी चाकरमान्यांची प्रचंड गर्दी होत असते. त्यामुळे नेहमी एसटी महामंडळाकडून जादा बसेसचे आयोजन केले जातं. त्याचप्रमाणे यंदाही जादा बसेस सोडण्याचं आयोजन केलं आहे. गेल्या काही महिन्यापासून सुरु असलेल्या एसटी कर्मचारी संपामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. प्रवाशांकडून खासगी वाहनधारकानी अव्वाच्या सव्वा भाडे आकारल्यामुळे प्रवाशांना विनाकारण भुरदंड बसत आहे. मात्र राज्यसरकारने घेतलेल्या निर्णयामुळे कोकणवासीयां
No comments:
Post a Comment