Wednesday, March 2, 2022

माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणत अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन बलात्काराचा गुन्हा दाखल.


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीशी वारंवार प्रेम असल्याचे भासवून तिला शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी भाग पाडले. याप्रकरणी अल्पवयीन मुलीशी गैरवर्तन केल्याप्रकरणी संभाजी नगर पोलीस ठाण्यात एका २२वर्षिय युवकाविरुद्ध  गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी १७  वर्षीय मुलीशी *आरोपी दर्शन प्रताप पुरभयै* रा.सावतामाळी मंदिर परिसर याने अल्पवयीन असलेल्या मुलीशी ओळख वाढवून जवळीक निर्माण केली. माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणत तिच्याशी संबंध प्रस्थापित केले.या आशयाची फिर्याद दिल्यावरुन आरोपी विरोधात संभाजी नगर पोलीस ठाण्यात कलम ३७६,(२)(एन),बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम २०१२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पिंक मोबाईल पथक पो.उपनि चौधर हे करीत आहेत.

No comments:

Post a Comment