Saturday, March 19, 2022

प्रतिदेहु जगद्गुरु श्री क्षेत्र संत तुकोबाराय पावनधाम येथे आरोग्य शिबीर संपन्न.दोन हजार भाविकांनी घेतला लाभ.


केज (प्रतिनिधी) तालुक्यातील प्रतिदेहू  श्री क्षेत्र संत तुकोबाराय पावनधाम येथे महंत महादेव महाराज बोराडे शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली दि.19 मार्च वार शनिवार रोजी  आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. 
सदरील शिबीरास डॉ. जितेंद्र डोलारे सर (साथ रोग नियंत्रण अधिकारी संचालक पुणे व त्यांचे सहकारी  व डॉ.शिवाजी मस्के,सावळेश्वर यांच्या टिमचे सहकार्य लाभले. सकाळी दहा ते पाच यावेळेत सर्व रोग निदान यामध्ये  प्रामुख्याने मधूमेह, उच्च रक्तदाब,मेंदू विकार, आर्युवेदिक काष्य थाळी मसाज, डोळे तपासणे, आणि स्वत दरात चष्मे वाटप करण्यात आले. शिबीराचा  जवळपास दोन हजार महिला-पूरूषांनी लाभ घेतला. आरोग्य शिबीराच्या यशस्वीतेसाठी  
 श्री क्षेत्र संत तुकोबाराय पावनधाम संस्थानचे संस्थापक अध्यक्ष तथा अखिल भारतीय वारकरी महामंडळाचे मराठवाडा विभागाचे अध्यक्ष ह. भ.प.महंत महादेव महाराज बोराडे शास्त्री ,अमोल महाराज,अशोक महाराज,जनार्धन महाराज चलवाड, हनुमंत म.सिरसाट,,दिलीप शिंदे,भागवत शिंदे,सुदाम पाटील,पंडित सावंत,सौदागर कदम,सुर्यकांत नांदूरे ,फुलचंद काकडे,शंकर उबाळे,अरूण काळे,गणेश महाराज भगत,प्रशांत निगडे,सचिन पतंगे,उमेश करपे,केशव धनगरे,पत्रकार संतोष रोकडे,उत्तम पारेकर,गणपत पांचाळ,तुकाराम कापसे यांच्यासह परिसरातील स्वयंसेवकांनी प्रयत्न केले.

No comments:

Post a Comment