नवी दिल्ली जागतिक बाजारात इंधनाचे दर वाढल्याच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी व्यावसायिक वापराच्या गॅस सिलिंडर दरात १०५ रुपयांची वाढ केली आहे. १९ किलो वजनाच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर आता २०१२ रुपयांवर गेले आहेत. दुसरीकडे पाच किलो वजनाच्या गॅस सिलिंडरचे दर देखील २७ रुपयांनी वाढून ५६९ रुपयांवर गेले आहेत. तेल कंपन्यांनी घरगुती गॅस सिलिंडरचे दर मात्र जैसे थे ठेवले आहेत.
जागतिक बाजारातील चढ-उतारानुसार दर महिन्याच्या 1 तारखेला गॅस सिलिंडर दरात बदल केले जातात. त्यानुसार मंगळवारी व्यावसायिक गॅस सिलिंडर दरात वाढ करण्यात आली आहे. ताज्या दरवाढीनंतर देशाची राजधानी दिल्लीत १९ किलो वजनाच्या गॅस सिलिंडरचे दर १९०७ रुपयांवरून २०१२ रुपये इतके झाले आहेत. कोलकाता येथे हेच दर १९८७ वरून २०९५ रुपयांवर तर मुंबईत १८५७ रुपयांवरून १९६३ रुपयांवर गेले आहेत.
No comments:
Post a Comment