Thursday, March 17, 2022

होळी, धुलीवंदनासाठी राज्य सरकारकडून नियमावली जारी.



मुंबई  :- करोना रुग्णांची संख्या कमी झाल्यामुळे राज्यात कोरोना प्रतिबंधक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. मात्र रुग्णसंख्या कमी झालेली असली तरी योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.

दोन वर्षानंतर निर्बंध शिथिल झाले असल्याने यावेळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जाण्याची शक्यता आहे. यामुळे पुन्हा एकदा लोकांची गर्दी होण्याची शक्यता आहे. ही गर्दी करोना संसर्गवाढीला कारणीभूत ठरू नये म्हणून राज्य सरकारने हे सण साजरे करण्यासाठी नियमावली जारी केली आहे.

राज्याच्या गृहविभागाने होळी तसेच धुलीवंदन साजरा करण्यासाठीची नियमावली जारी केली आहे . या नियमावलीनुसार रात्री १० वाजताच्या आत होळी पेटवणे बंधनकारक करण्यात आलंय. तसेच होळीदरम्यान डीजे लावण्यावरदेखील बंदी घालण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment