Monday, March 7, 2022

शिवरायांच्या पुतळ्या वरून पोलीसांनी दिलेल्या वागणूकीमुळे रवी राणांच्या फाशी घेण्याच्या धमकीमुळे विधिमंडळ परिसरात खळबळ.

मुंबई : शिवरायांच्या पुतळ्यावरून पोलिसांनी दिलेल्या वागणुकीमुळे आमदार रवी राणांनी विधिमंडळाच्या परिसरात राज्‍य सरकारचा निषेध केला. न्याय मिळाला नाही तर मी इथेच फाशी घेईल, असा इशारा त्यांनी दिल्याने एकच खळबळ उडाली.
राणा म्‍हणाले, की आम्ही शिवरायांचा पुतळा बसवून दुग्धाभिषेक केला. मात्र पाचच दिवसांत पुतळा उड्डाणपुलावरून काढून टाकण्यात आला. छन्‍नी, हातोड्याने पुतळा काढून गोडाऊनमध्ये ठेवण्यात आला. आराध्य दैवताला गोडाऊनमध्ये टाकल्याने शिवभक्तांच्या भावना दुखावणारच होत्या. त्‍यामुळे काही संतप्त शिवभक्तांनी मनपा आयुक्तांवर शाई फेकल्याची घटना घडली. त्‍यावेळी मी दिल्लीत होतो. तिथे मला फोन आला आणि अमरावतीत ३०७ चा गुन्हा दाखल माझ्यावर दाखल झाल्याचे मला कळले.याबद्दल पोलीस आयुक्तांना विचारले असता सरकारमधील लोकांनी गुन्हा दाखल करायला लावल्याचे त्‍यांनी सांगितले. नंतर १०० ते १५० पोलीस माझ्या घरी गेले. घरात घुसून तपासणी करत खासदारांचाही अपमान केला. राज्‍याचे गृहमंत्री व मुख्यमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांना करून गुन्हा दाखल करायला लावला. मला अटक करण्याचे आदेश दिले, असा आरोप रवी राणांनी यावेळी केला.

आरती सिंग पोलीस आयुक्त आहेत. त्यांनी आमच्यावर दबाव असल्याचे सांगितले. त्‍यामुळे न्याय मिळाला नाही तर इथेच फाशी घेईन, असा इशाराही राणांनी दिला. त्‍यांनी फलक झळकावून अन्यायाविरोधात दाद मागितली. या प्रकरणात विधिमंडळात समिती निर्माण करून मनपा आयुक्त प्रवीण आष्टीकर आणि पोलीस आयुक्त आरती सिंग यांना निलंबित करा, अशी मागणीही राणांनी केली.

No comments:

Post a Comment