Saturday, March 5, 2022

पुढील दोन दिवसात विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळणार.हावामान खात्याचा अदांज.

मुंबई : मागील दोन आठवड्यापासून राज्यात सूर्य आग ओकत आहेत . मार्चच्या सुरुवातीलाच अनेक ठिकाणी किमान आणि कमाल तापमानात विक्रमी वाढ झाली आहे . काल मुंबईत देखील तापमानात प्रचंड वाढ झाली होती . येथील पारा ३७.१ अंश सेल्सिअसवर पोहोचला होता . त्यामुळे सकाळपासूनच नागरिकांना उकाड्याचा त्रास जाणवू लागला होता . त्यानंतर आजही राज्यात कमी अधिक प्रमाणात हीच स्थिती कायम आहे . पण विकेंडनंतर दोन दिवस कोकणासह दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे . विकेंडनंतर पुढील दोन दिवस राज्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे . हवामान खात्याने जारी केलेल्या माहितीनुसार , सोमवारी ०७ मार्च रोजी पालघर जिल्ह्यात ढगाळ हवामानाची शक्यता असून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळणार आहे . तसेच याचदिवशी नाशिकसह , धुळे , नंदुरबार आणि जळगाव या ठिकाणी विजांचा गडगडाट होणार आहे . त्यामुळे आकाशात विजा चमकत असताना नागरिकांनी घराबाहेर पडू नये , अथवा लांबचा प्रवासा टाळावा , असा सल्ला हवामान विभागाकडून देण्यात आला आहे . मंगळवारी ( ८ मार्च ) राज्यात पावसाची व्याप्ती आणखी वाढणार असून कोकणासह दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे . मंगळवारी पालघर , ठाणे , रायगड , रत्नागिरी , सातारा , सिंधुदुर्ग , कोल्हापूर , बीड , परभणी आणि हिंगोली या दहा जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे . तर दरम्यान पुण्यासह अहमदनगर , नाशिक , धुळे , जळगाव , नंदुरबार , औरंगाबाद आणि जालना या जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात विजांचा कडकडाट होणार आहे . यासोबत , नैऋत्य बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेला हवेच्या दाबाचं क्षेत्र मागील ०६ तासांत १५ किमी प्रतितास वेगानं उत्तर वायव्य दिशेनं दिशेनं सरकला आहे . त्यामुळे देशभरात अनेक ठिकाणी पावसासाठी पोषक हवामान तयार झालं आहे . याचाच परिणाम + म्हणून आज तामिळनाडूचा किनारी प्रदेश , पुड्डुचेरी , कराईकल , दक्षिण आंध्र प्रदेश आणि रायसीमा परिसरात विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे 

No comments:

Post a Comment