Thursday, March 17, 2022

ऑल इंडिया ग्रामीण डाकसेवक युनियन विभागीय शाखा अमरावती च्या वतिने धरणे आंदोलन मागण्या त्वरित पूर्ण कराव्या - बी. एस.एफ.ग्रुप.ची मागणी.


 अमरावती : (प्रतिनिधी)आज रोजी ऑल इंडिया ग्रामीण डाकसेवक युनियन विभागीय शाखा अमरावती तर्फे 2 दिसवीय धरणे आंदोलन सुरू आहे. त्यांच्या मागण्या आहेत की कामगार विरोधी कायदे रद्द करावे, नवीन पेन्शन योजना करून जुनी पेन्शन योजना सुरू ठेवावी, जीडीएस सहित सर्व कर्मचाऱ्यांना सामूहिक विमा कवच लागू करा, डाकसेवेचे खाजगीकरण थांबवा, जीडीएस कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा लागू करा, 12,24,36 व्या वर्षी आर्थिक पदोन्नती लागू करा, पेड लिव्ह 180 दिवसापर्यंत जमा करण्यात यावी, केंद्रीय वैद्यकीय सुविधा ई. एस.आय अंतर्गत वैद्यकीय लाभ प्रदान करावा, प्रोत्साहन भत्ता किंवा मानधन वर आधारित कामे बंद करून अवास्तविक टार्गेट बंद करा,बंचिंग आदेश लागू करा, विवाहित महिलांना अनुकम्पा नियुक्ती आदेश लागू करा, सेवानिवृत्तिचे लाभ कामाच्या शेवटच्या दिवशी पेड करा, तसेच दि.11/2/22 रोजी सबस्टिट्यूट लावण्यासबंधी काढलेले आदेश व कठोर निर्बंध परत घ्या. अश्या विविध मागण्या ऑल इंडिया ग्रामीण डाकसेवक युनियन च्या आहेत.

यावेळी बी. एस.एफ.ग्रुप.अध्यक्ष भूषण सरदार यांनी तिथे प्रत्यक्षात जाऊन भेट घेतली व त्यांना ग्रुप चा पाठिंबा जाहीर केला. यावेळी कॉ. पी. जयस्वाल, कॉ.एस.तळकीत, कॉ. एम.के.काझी, आर.एस.कोहरे,कॉ. तोसोफुद्दीन,कॉ. कॉ. डाफे, कॉ. चरपे, कॉ. पांडे, कॉ. साळवन, कॉ. आरोळे,कॉ. पडोळे, कॉ. आवारे कॉ. गावंडे इत्यादी कर्मचारी उपस्थित होते

No comments:

Post a Comment