परळी वैजनाथ (प्रतिनिधी) बीड जिल्हा बाधकाम कामगार संघटनेच्या वतीने आयोजित आरोग्य तपासणी शिबिराचा कामगारांना मोठ्या प्रमाणावर लाभ झाला.या शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद कामगारांनी दिला. दुर्लक्षित बांधकाम कामगारांच्या आरोग्याची काळजी घेणारा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे यावेळी उद्घाटक जेष्ठ नेते श्रीकांत मांडे यांनी सांगितले.
बीड जिल्हा बाधकाम कामगार संघटनेच्या वतीने आज दि 14/3/2002 रोजी कामगारांचे आरोग्य तपासणी शिबीर संपन्न झाले. आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन सामाजीक कार्यकर्ते श्रीकांत मांडे यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रा बी.जी खाडे होते. यावेळी बीड जिल्हा आशा वर्कर्स युनियनचे उपाध्यक्ष किरण सावजी, सिटू कार्यकर्ते जावेद शेख, स्वा.वि.दा.सावरकर पतसंस्थेचे सचिव जितेंद्र नव्हाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. या शिबिरात बांधकाम कामगारांच्या आरोग्याची संपूर्ण तपासणी करण्यात आली. महालॅबचे जिल्हा समन्वयक राहूल तिडके यांनी आपली संपूर्ण टीम आणली होती. यामध्ये डॉ. गुट्टे, अविनाश गिते, ओम राउत आदींनी तपासणी केली. शिबीर यशस्वी करण्यासाठी सिटू कार्यकर्ते शेख जावेद यांनी परिश्रम घेतले. शिबीरात मोठ्या संख्येने बांधकाम कामगार सहभागी झाले हो

No comments:
Post a Comment