Thursday, March 3, 2022

केज तालुक्यात अल्पवयीन मूलीचे अपहरण.अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल.




केज (प्रतिनिधी) 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण केले गेले असल्याची घटना केज तालुक्यातील युसुफवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली . याप्रकरणी अज्ञात व्यक्तिविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.केज तालुक्यात 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचे 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 ते साडेदहा वाजेच्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून अपहरण केल्याची घटना घडली . तिच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला . मात्र तिचा कुठेही ठावठिकाणा लागला नसल्याने तिच्या आईने पोलिसात धाव घेतली . सदर मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तिविरुद्ध युसुफवडगाव पोलिसात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे . स.पो. नि. संदीप दहिफळे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक फौजदार तुपारे हे पुढील तपास करत आहेत .

No comments:

Post a Comment