परळी वैजनाथ (प्रतिनिधी)परळी वैजनाथ येथील माणिक नगर भागातील सामाजिक कार्यकर्ते दिगंबर प्रल्हादराव दंदे वय वर्ष 79 यांचे आज शुक्रवार दिनांक 18 मार्च रोजी वृद्धापकाळाने अंबाजोगाई येथे रुग्णालयात उपचार घेत असताना निधन झाले. माजी नगरसेवक विठ्ठलराव दंदे यांचे ते ज्येष्ठ बंधू होत.
माणिक नगर भागातील सामाजिक कार्यकर्ते दिगंबर प्रल्हादराव दंदे यांचे आज शुक्रवारी निधन झाले .अत्यंत मनमिळावू, सुस्वभावी , सामाजिक, धार्मिक कार्यात सक्रिय सहभागी असणारे म्हणून दिगंबरराव दंदे यांची ओळख होत. माजी नगरसेवक विठ्ठलराव दंदे यांचे ते ज्येष्ठ बंधू होत. वैजनाथ व सोमनाथ गडेकर तसेच ज्ञानेश्वर व रामेश्वर खर्डे यांचे ते मामा होत. दिगंबर राव दंदे यांच्या पार्थिवावर शुक्रवारी दुपारी चार वाजता परळी वैजनाथ येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.कांतीकारी साथी परिवार दंदे यांच्या दुःखात सहभागी आहे.
No comments:
Post a Comment