मुंबई(प्रतिनिधी )सध्या राज्यातील अनेक भागात हरभरा आणि गहू काढण्याची तयारी सुरू आहे. या कामात पाऊस अडथळा आणू शकतो. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार राज्यात 7 ते 10 तारखेपर्यंत पाऊस हजेरी लावणार आहे. विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
दरम्यान महाराष्ट्र, गुजरात, पूर्व राज्यस्थान आणि पश्चिम मध्य प्रदेश या भागात दिनांक 7 ते 10 या कालावधीत विजांच्या गडगडाटासह काही भागात तुरळक पाऊस हजेरी लावणार आहे. आपल्या काढणी झाल्या असतील तर लवकर मळणी करून घ्या, अशा सूचना शेतकऱ्यांना दिल्या आहेत.
7 मार्च रोजी या ठिकाणी पाऊस -
आज नंदुरबार, धुळे, नाशिक, औरंगाबाद, आणि जळगाव या भागाला हवामान खात्याने येलो अलर्ट दिला आहे. या भागात जोरदार पाऊस कोसळणार असे सांगितले आहे. तसेच पालघर, ठाणे, पुणे व अहमदनगर या ठिकाणी तुरळक पाऊस पडणारी आहे असे सांगितले.
८ व ९ मार्च रोजी -
धुळे, जळगाव, नंदुरबार, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, बुलढाणा, परभणी, जालना, बीड, परभणी, वाशीम, हिंगोली,अकोला , अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस कोसळणार.
१० मार्च रोजी -
बुलढाणा, अकोला, वाशीम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे. जळगाव, औरंगाबाद, अहमदनगर, पुणे, सातारा, नाशिक, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, धुळे या भागात हलका पाऊस पडणार आहे
No comments:
Post a Comment