Tuesday, March 8, 2022

एसटी संपाबाबतचं गोपनीय पत्र व्हायरल, कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कडक कारवाई होणार; नुकसान भरपाई म्हणून लाखो रूपये घेणार .


मुंबई – गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. राज्य सरकारमध्ये एसटीचं विलीनीकरण करण्यात यावं या प्रमुख मागणीसाठी हा संप सुरु आहे. दरम्यान हा संप अनेक महिन्यांपासून सुरू असून त्यावर राज्य सरकारने अद्याप तोडगा काढत नसल्याने अनेक कर्मचा-यांनी पुन्हा कामावर रूजू झाल्याचे पाहायला मिळत आहेत.  आत्तापर्यंत अनेक कर्मचा-यांनी कुटुंबियावर उपास मारीची वेळ आल्याने आत्महत्या देखील केली त्यामुळे या महाविकास आघाडीच्या सरकारला केव्हा जाग येईल अशी विरोधकांनी टीका देखील केली आहे.

दरम्यान, आता एसटीच्या संपाबाबत एक गोपणीय पत्र व्हायल झालं असून ते मोबाईलवरती आणि सोशल मीडियावरती फिरत असून त्यामध्ये कर्मचा-यांना गोड बोलून कामावर घेतलं जात आहे. त्याचबरोबर मी संपात सहभागी होतो असं जबरदस्तीने लिहून देखील घेतलं जात आहे. त्यामुळे नेमकं हे राज्य सरकारचं पत्र आहे की अन्य कुणी तयार करून ते फिरवत आहे, याबाबत कुठलीही स्पष्टता झालेली पाहायला मिळत नाही. त्यामुळे त्या पत्राची एसटी कर्मचा-यांमध्ये अधिक चर्चा आहे.

विशेष बाब म्हणजे कारवाई संदर्भातील हे पत्र वेगाने व्हायरल होत असलं तरी पडताळणी झाल्यानंतर ते पत्र फेक आहे याची खात्री झालेली आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या कुठल्याही पत्रकावर विश्वास  ठेवु नये असे आवाहन करण्यात येत आहे. 

No comments:

Post a Comment