
घाटनांदुर (प्रतिनिधी) : परळी किसान पुत्र आंदोलनाच्या वतीने १९ मार्च रोजीच्या अन्नत्याग आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पानगाव ते अंबाजोगाई अशी सलग तीन दिवस काढण्यात आलेल्या पदयात्रेचे घाटनांदूर येथे जोरदार स्वागत करण्यात आले. देशभरातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या प्रति सहवेदना व्यक्त करण्यासाठी राज्यातील २० जिल्ह्यातील ५० किसान पुत्रांनी पानगाव ते अंबाजोगाई अशी सलग तीन दिवस शेतकरी सहवेदना पदयात्रा काढण्यात आली असून ही पदयात्रा शहरात दाखल होताच या पदयात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले.
घाटनांदूर - येथे किसानपुत्र आंदोलनाच्या वतीने पानगाव ते आंबाजोगाई पदयात्रा दरम्यान यात्रेचे स्वागत सर्वश्री गोविंदराव देशमुख, बाळासाहेब देशमुख, राहुल शिंदे, शिवाप्पा शेटे, रामभाऊ वैद्य, सुरेश सु.जाधव आदिंनी जल्लोशात केले.
किसान पुत्र आंदोलन पदयात्रेच्या निमित्त रात्री बडे नागनाथ यांच्या घरी कविसंमेलन बालाजी मुंढे, रमेश मोटे, नितीन राठोड, सतु जाधव, नागनाथ बडे, दत्ता वालेकर, अरुण चाटे यांनी कविता सादर करून शेतकरी सहवेदना जाग्या केल्या.
No comments:
Post a Comment