बीड (प्रतिनिधी) स्त्री - शक्ती प्रतिष्ठान बीड आणि पसायदान सेवा प्रकल्प ढेकणमोहा यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ७ मार्च २०२२ रोजी संध्याकाळी ६ - ०० वाजता महीला दिनाच्या पूर्वसंध्येला बीड शहरातील आणि परिसरातील समाजाच्या विविध क्षेत्रात आपल्या कार्य कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या माता भगीनींनचा पद्मश्री डॉ सिंधुताई सपकाळ (माई) यांच्या नावाने पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यावर्षी श्रीमती अवंतिकाताई वासनीक , मनिषा ताई पवार , गुलाबताई लोळगे , सिमाताई विघ्ने , सुदामतीताई मुंढे , डॉ. सुहासिनीताई जाधव , अनुराधाताई वाघमारे , रेखाताई घोलप , सोनमताई तांदळे , कोमल ताई बोरा , मनिषा ताई ढाकणे , श्वेतांबरीताई घाडगे , करुणा ताई मगर , सावित्रीबाई साळूंके , गवळणताई दराडे , डॉ. सुवर्णा ताई बेद्रे , रमाबाई गिरी , मनिषाताई घुले यांना प्राचार्या सौ. सत्यभामा ताई बांगर , डॉ. सारीकाताई क्षीरसागर यांच्या विशेष उपस्थितीत तर नगराध्यक्षा सौ. वंदनाताई शेषेराव जगताप यांच्या अध्यक्षतेखाली सौ. जयश्रीताई विलास विधाते , सौ. संध्याताई दत्ता बारगजे , सौ. कावेरीताई दिपक नागरगोजे ,
सौ. वर्षाताई ठाकुर यांच्या प्रमुख उपस्थितीत पसायदान सेवा प्रकल्प ढेकणमोहा येथे पुरस्कार प्रदान सोहळा पार पडणार असुन आपल्या माता भगिनींनच्या लेकीबाळीच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी व त्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी या कार्यक्रमाला बीड शहरातील तसेच परिसरातील माता भगिनींनी उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन स्त्री शक्ती प्रतिष्ठान बीड पसायदान सेवा प्रकल्प ढेकणमोहा यांच्या वतीने करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment