Wednesday, February 2, 2022

काँग्रेसला सोडचिठ्ठी देत ॲड.संजय रोडे यांचा वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश.

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) परळी शहर काँग्रेस चे प्रवक्ता तथा काँग्रेस अनुसूचित जाती जमाती विभाग अध्यक्ष  ॲड.संजय रोडे यांनी आज काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत वंचित बहुजन आघाडीत जाहिर प्रवेश केला आहे.
    वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष मा.ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी आज येथील चेमरी रेस्ट हाऊस येथे पक्षाचे मराठवाडा अध्यक्ष मा. अशोकभाऊ हिंगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीत जाहिर प्रवेश केला.
    यावेळीॲड. संजय रोडे यांनी आपली भूमिका मांडताना सांगितले की, काँग्रेस पक्षामध्ये अनुसूचित जाती जमातीचे प्रश्नावर काहीही कार्यक्रम नसून पक्षात योग्य न्याय मिळत नसल्याने  आपण पक्ष सोडत आहोत. बाळासाहेबांच्या कणखर नेतृत्वाखाली आता आपण जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीचे काम जोमात करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 
     आज दि.2 रोजी येथील चेमरी रेस्ट हाऊस येथे संपन्न झालेल्या या पक्ष प्रवेश सोहळ्याला वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अनिल डोंगरे, जिल्हा महासचिव पुरुषोत्तम वीर, मिलिंद घाडगे, प्रा.बालाजी जगतकर, वंचित बहुजन आघाडी प्रणित अखिल महाराष्ट्र कामगार संघ बीड जिल्हाध्यक्ष बालासाहेब जगतकर,शहराध्यक्ष संजय गवळी, प्रसेनजीत रोडे, धम्मा क्षीरसागर, राजेश सरवदे, बळीराम डुमणे, अविनाश मुंडे, गौतम आदमाने, साहेबा रोडे, रमेश झिंजुर्डे, धम्मा पैठणे, अमित सावंत यांचेसह अंबाजोगाई, केज,धारूर, माजलगाव येथील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment