*बनावट प्रमाणपत्र प्रकरणात न्यायालयाने शिक्षा ठोठावल्या पासून होता फरार.
केज :- (प्रतिनिधी) न्यायालयाने शिक्षा ठोठावल्या पासून अकरा वर्ष फरार असलेल्या आरोपीला केज पोलीसांनी मोठ्या शिताफीने बेड्या ठोकल्या असून त्याची रवानगी कारागृहात केली आहे.
या बाबतची माहिती अशी की, अकरा वर्षा पूर्वी केज तालुक्यातील लव्हुरी येथील छत्रभुज चाळक बनावट अपंग प्रमाणपत्र व बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र तयार करून फसवणूक केल्या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर प्रकरणी त्यांंना केज न्यायालयाने दोषी ठरवून पंचवीस हजार रु. दंड व एक वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली होती. तसेच या निर्णयाला त्यानी आवाहन देत सत्र न्यायालयात अपील केले असता सत्र न्यायालयानेही त्यांंची शिक्षा कायम ठेवली होती. दरम्यान त्या निर्णया नंतर अकरा वर्ष छत्रभुज चाळक पोलिसांना गुंगारा देऊन फरार होते. अकरा वर्षां पासून त्यांंच्यावर स्टँडिंग वॉरंट होते. दरम्यान शिक्षा झालेला फरार आरोपी हा त्यांंच्या घरी आल्याची माहिती सहाय्यक फौजदार अनिस शेख यांना मिळताच त्यांनी दि. ३१ जानेवारी रोजी मध्यरात्री १२:१५ वा. च्या दरम्यान त्यांचे वरिष्ठ पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे यांना माहिती दिली आणि सहाय्यक फौजदार कादरी, पोलीस नाईक शेख चाँद यांना सोबत घेऊन छत्रभुज चाळक ताब्यात घेतले. ताब्यात घेऊन त्याना न्यायालया समोर हजर करून त्यांंची रवानगी कारागृहात केली आहे.
No comments:
Post a Comment