
केज (प्रतिनिधी) केज विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार पृथ्वीराज साठे यांच्या गाडीला अपघात झाला आहे. या अपघातात सुदैवाने कोणीही गंभीर जखमी झालेले नाही . माजी आमदार साठे हे केज बीड महामार्गावरुन जात असताना केज पासून जवळच असलेल्या टाकळी फाट्यावर दुचाकीस्वारास वाचवण्याच्या प्रयत्नात त्यांच्या गाडीला अपघात झाला आहे . या अपघातात त्यांची गाडी रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली आहे. यामध्ये गाडीचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे . परंतु यात सुदैवाने कुणीही गंभीर जखमी झालेले नाही . सदर घटना शनिवारी दुपारी तीन ते चारच्या सुमारास घडली आहे . दरम्यान अपघात झाला त्याचवेळी युवानेते अक्षय मुंदडा हे बीडकडून आले होते . सदर घटना त्यांनी पाहताच त्यांनी थांबून गाडीतील माजी आमदार साठे यांना व इतर दोघांना बाहेर काढून तात्काळ दवाखान्यात पाठवून दिल्याचे कळते.
No comments:
Post a Comment