Saturday, May 8, 2021

मंगळवार बुधवारी किराणा व इतर अत्यावश्यक सेवा सुरू !



प्रशासनाचा यु टर्न !मंगळवार बुधवारी किराणा व इतर अत्यावश्यक सेवा सुरू !

बीड - (प्रतिनीधी) बीड जिल्हा प्रशासनाने अवघ्या 12 तासांपूर्वी सलग पाच दिवस लॉक डाउन ठेवण्याचा आदेश अखेर मागे घेतला असून येत्या मंगळवारी आणि बुधवारी किराणा ड्रायफ्रूट चिकन मटन ची दुकाने आणि मिठाईची दुकाने सकाळी सात ते दहा या दरम्यान सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे प्रशासनाने हा अचानक यू टर्न घेतल्यामुळे नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे अशा पद्धतीने जर लॉक डाऊन सुरू राहिले तर करून आटोक्यात येणार कसा प्रशासनाने अशी ढिलाई करण्यापेक्षा अधिक कडक निर्बंध लावणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले जात आहे

बीड जिल्ह्यातील वाढती कोरणा रुग्णसंख्या लक्षात घेऊन प्रशासनाने शनिवार ते बुधवार म्हणजेच आठ ते बारा मे पर्यंत कडक लोक डाऊन करण्याचे आदेश शुक्रवारी सायंकाळी काढले यामध्ये मेडिकल वगळता इतर सर्व अत्यावश्यक अस्थापना बंद ठेवण्यात येतील असे म्हटले होते परंतु अवघ्या बारा तासाच्या आत प्रशासनाने हा आदेश फिरवला असून मंगळवार आणि बुधवारी म्हणजेच 11 आणि 12 तारखेला किराणा ड्रायफ्रूट मिठाईची दुकाने चिकन मटन ची दुकाने सुरू राहतील असे नवे आदेशात म्हटले आहे तसेच दहा ते बारा या वेळेत बँका देखील सुरू राहतील असे म्हटले आहे मंगळवार आणि बुधवारी सकाळी सात ते दहा या वेळेतच किराणा व इतर दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी प्रशासनाने दिली आहे

इकडे बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात करुणा रुग्ण वाढत असताना खडक निर्बंध लावून महिना होत आला तरी रुग्ण संख्या कमी होत नसल्याचे चित्र आहे आणि दुसरीकडे प्रशासन जर लावलेले खडक लावून कमी करणारा असेल तर हा एक प्रकारे कोरोनाला आमंत्रण देण्याचा प्रकार म्हणावा लागेल

No comments:

Post a Comment