Thursday, May 20, 2021

कांतीकारी साथी न्युज जाणुन घ्या आजचे राशी भविष्य.असा असेल तुमचा गुरूवार.

  1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: शारीरिक तसेच मानसिक आरोग्य चांगलं राहील. रखडलेले काम मार्गी लागेल. व्यवसायात चांगला नफा होईल. उत्पन्नाचे नवे स्त्रोत तयार होतील. जवळच्या व्यक्तींची मदत लाभेल. रंग शुभ - हिरवा. 
  2.  
  3. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: धन लाभ होईल. प्रवासाचा योग आहे. परदेशात स्थायिक झालेल्या व्यक्तींकडून शुभ वार्ता येतील. धार्मिक कार्यात पैसा खर्च कराल. रंग शुभ - निळा.
  4.  
  5. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: दिवस लाभदायक आहे. मित्रांच सहकार्य मिळेल. महत्त्वपूर्ण निर्णय पुढे ढकलावे. अनेक विचारांमध्ये व्यस्त असाल. धन लाभ होण्याची शक्यता आहे. शुभ रंग - पिवळा. 
  6.  
  7. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगलं राहील. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. कुटुंबात आनंदाच  वातावरण असेल. वडिलांचा आशिर्वाद मिळेल. सरकारी काम पूर्ण होईल. वैवाहिक जीवन चांगले राहील. रंग शुभ - हिरवा.
  8.  
  9. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: मानसिक आणि शारीरिक आरोग्याची काळजी घ्या. तडजोड केल्यास वाद होणार नाही. प्रवास टाळा. लेखक, कलाकार आणि सल्लागारांसाठी  दिवस शुभ आहे. नवीन काम सुरू करू नये. शुभ रंग - हिरवा.
  10.  
  11. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: दिवस आनंदाने आणि उत्साहाने भरलेला असेल. नवीन कामामध्ये तुम्हाला यश मिळेल. धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकता. कुटुंबासमवेत गोड जेवणाचा आनंद घ्याल. वैवाहिक जीवन आनंददायी राहील. रंग शुभ - पिवळा.
  12.  
  13. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today:  प्रशासन आणि राजकारणाशी संबंधित लोकांना फायदा होण्याची शक्यता आहे. लव लाइफ झकास असेल. वैवाहिक जीवनात सुख मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. शुभ रंग - लाल.
  14.  
  15. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: राजकारणात यश मिळेल. व्यावसायिकांसाठी दिवस प्रगतीशील असेल. मीडिया आणि आयटीशी संबंधित लोक त्यांच्या कामावर समाधानी असतील. वैवाहिक जीवन उत्तम राहील. गायत्री मंत्र वाचा. शुभ रंग - पिवळा.
  16.  
  17. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: दिवस तुमच्यासाठी भाग्यकारक आहे. आर्थिक फायद्यांबरोबरच नशीबाचीही साथ मिळेल. प्रियजनांशी नातेसंबंधात प्रेम वाढेल. नवीन काम सुरू करण्यासाठी वेळ शुभ आहे. मानसिकदृष्ट्या आनंदी असाल. शुभ रंग - लाल. 
  18.  
  19. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: कामात खूपच बिझी असताना सुद्धा तुम्ही कौटुंबिक कार्यासाठी वेळ काढाल. विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळेल. श्री विष्णू जीं ची उपासना करा. शुभ रंग - पांढरा.
  20.  
  21. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. मित्र आणि नातेवाईकांकडून भेटवस्तू मिळाल्यामुळे आनंद होईल. काम सहजपणे पूर्ण होईल. व्यवसायात फायदा होईल. आरोग्य चांगले राहील. शुभ रंग - हिरवा. 
  22.  
  23. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: कुटुंबातील सदस्यांशी होणारे गैरसमज टाळा. वायफळ खर्च होईल. मानसिक गोंधळ झाल्यामुळे आपण महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ शकणार नाही. आरोग्य उत्तम राहील. शुभ रंग - केशरी

No comments:

Post a Comment