Thursday, May 6, 2021

परळीत कोविड लसीकरण प्रक्रियेत प्रचंड घोळ.!"लस" दिल्याचे प्रमाणपत्र दिले पण लस दिलीच नाही,दोषींवर कार्यवाही करा.-- प्रा पवन मुंडे

परळी वैजनाथ (प्रतिनिधी): परळी येथील सावतामाळी मंदिर परिसरातील खंडोबा मंदिर जवळील प्राथमिक आरोग्य केंद्रात 1 मे 2021 रोजी लसीकरण मोहीम राबविण्यात आली,या लसीकरण मोहिमेत एका महिलेला लस न मिळताच तिला लसीकरण दिले असल्याचे प्रमाणपत्र मिळाले आहे,तरी तिच्या नावाची लस दुसऱ्याच कोणीतरी घेतली असून संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी भाजपाचे नगरसेवक प्रा पवन मुंडे यांनी केली आहे.
या प्रसंगी सत्यभामा आत्माराम पांचाळ , वय 59 रा.किर्तीनागर ही महिला खंडोबा नगर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लस घेण्यासाठी गेली असता त्या महिलेची त्या ठिकाणी ऑनलाइन पद्धतीने 29 एप्रिल रोजी  व्यवस्थित नाव नोंदणी झाली होती व त्यांना वॅक्सिंन मिळणे बाबत 1 मे 2021 ही तारीख देण्यात आली होती मात्र त्या महिलेच्या नावाची लस अन्य कोणीतरी घेतली आणि त्या महिलेला लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र 1 मे रोजी दुपारी मेसेजवरून मिळाले.सदरील प्रकार अत्यंत निंदनीय असून वयोवृद्ध लोक लसीच्या डोस साठी तासंनतास रांगेत उभा राहात असून त्यांची लस जर इतर कोणी घेत असेल तर ही बाब गंभीर असून सदरील प्रकारनात जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी  चौकशी करून दोषी कर्मचाऱ्यांवर त्वरित कार्यवाही करावी व तालुका आरोग्य अधिकारी डॉ लक्ष्मण मोरे यांनी सदरील घटनेबाबत स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी नगरसेवक प्रा मुंडे यांनी केली आहे

No comments:

Post a Comment