परळी वैजनाथ (प्रतिनिधी) वीरशैव समाजातील जेष्ठ महिला श्रीमती यमुनाबाई महालिंगअप्पा शेटे रा.घरणीकर रोड यांचे गुरूवारी रात्री वृद्धापकाळाने निधन झाले. त्या 68 वर्षाच्या होत्या.
शहरातील व्यापारी नंदकुमार शेटे यांच्या मातोश्री श्रीमती यमुनाबाई महालिंगअप्पा शेटे यांचे गुरूवारी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर आज शुक्रवारी सकाळी वीरशैव स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यात आले. मनमिळावू स्वभाव व समाजातील धार्मीक, सांस्कृतिक कार्यक्रमात त्यांचा सहभाग असल्याने त्या सर्वत्र परिचयाच्या होत्या. त्यांच्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, सुन, नातवंडे असा परिवार आहे.शेटे परिवाराच्या दुःखात दै.कांतीकारी साथी परिवार सहभागी आहे.
No comments:
Post a Comment