
बीड - (प्रतिनीधी) महसूल प्रशासनाने केलेल्या कारवाई संदर्भात गुन्हा दाखल करण्यास उशीर करत याची चौकशी करणाऱ्या पत्रकारांना अपमानास्पद वागणूक देणाऱ्या पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्याविरुद्ध पत्रकारांनी एकजूट दाखवत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी पोलिस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे केली .
बीड जिल्ह्यात वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी 12 तारखेपर्यंत कडक लॉक डाऊन केले आहे .मात्र मोंढ्यातील काही व्यपाऱ्यांनी पहाटे चार ते सात या वेळेत दुकाने उघडून नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी बीडचे तहसीलदार आणि पथकाने दुकाने सील करण्याची कारवाई रविवारी सकाळी केली .
त्यानंतर या प्रकरणात गुन्हे दाखल करण्यासाठी पेठ बीड पोलिसांना तक्रार देण्यात आली,मात्र पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांनी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल न करून घेता कारवाईस टाळाटाळ केली .यावेळी तेथे हजर असलेल्या पत्रकारांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत अपमानास्पद वागणूक दिली .
या विरोधात जिल्ह्यातील विविध दैनिकाचे, चॅनेलचे पत्रकार एकत्र आले,विश्वास पाटील यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी जिल्हाधिकारी रविंद्र जगताप आणि पोलिस अधीक्षक आर रामस्वामी यांच्याकडे केली .यावेळी पाटील यांची चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले .
No comments:
Post a Comment