कोरोनाच्या या गंभीर परिस्थितीत लोकांचे खायचे आणि जगायचे वांदे असताना विद्यार्थ्यांकडून फी वसुल करणाऱ्या विद्यापीठ आणि राज्य सरकार च्या विरोधात सम्यक विद्यार्थी आंदोलन संघटनेला सोबतीला घेऊन विद्यार्थ्यांनी ऑनलाईन आंदोलन केले.
महाविद्यालय, विद्यापीठ, जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शिक्षण महासंचालक, शिक्षण मंत्री, तंत्र शिक्षण, समाजकल्याण विभाग यांसारख्या विविध अधिकाऱ्यांना निवेदन देऊन मागणी करून देखील कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने विद्यार्थ्यांनी हे पाऊल उचलले.
आंदोलनावेळी #feeconcession #sppu #fees_must_fall_down #msbt #sva #फी_माफी_झालीच_पाहिजे हे #Tag वापरण्यात आले. त्यामध्ये प्रमुख मागण्या *महाविद्यालयांतील सर्वच विद्यार्थ्यांची Admission आणि Exam फी पुर्णपणे माफ करावी. ज्या विद्यार्थ्यांकडून पुर्ण अथवा निम्मी फी महाविद्यालयाने वसुल केली आहे ती त्यांना परत करावी.* अश्या मागण्या करत 28 मे रोजी प्रदेशाध्यक्ष मा.महेश भारतीय सर आणि प्रकाश इंगळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली दिवसभर आंदोलन करण्यात आले.
आंदोलन यशस्वी करण्यासाठी कौस्तुभ ओव्हाळ, संघर्षा संखद, अबोली भालेराव, माजी जिल्हाध्यक्ष शुभम चव्हाण, प्रतिक चव्हाण, रोहित भोसले, ऋतिक महामुनी, राहुल जगताप, अमृता पवार, अनिकेत खांडेकर, विकी अवचार, दामिनी चव्हाण, विश्वजीत कदम, विराट उजगरे, विपुल सोनवणे, आकाश आकडे, आर्या वाघ, सानिया शेख, बॉबी बेरजे, सुरज घाडगे, विनय दामोदरे, स्वराज जकाते, ऋषिकेश वाघमारे, ओंकार कांबळे, भुषण पाईकराव, अक्षय गोटेगावकर आदींनी सहकार्य केले.
विद्यार्थ्यांच्या मागण्या पुर्ण न केल्यास आंदोलन अधिक तीव्र स्वरूपाचे केले जाईल असा इशारा असा इशारा कॉलेज प्रशासन आणि संबंधित अधिकारी, शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आला. अशी माहिती सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे बारामती तालुका अध्यक्ष रोहित भोसले यांनी दिली.
No comments:
Post a Comment