Thursday, May 6, 2021

परळीत तीन लसीकरण केंद्रावर लसीकरण सुरू. प्रशासनाच्या सर्व नियमांना केराची टोपली.सोशल डिस्टन्सचा फज्जा !


 * प्रशासकिय  गाईडलाइन ला शक्तीकुंज वसाहत केंद्रावर केराची टोपली!

*ऑनलाइन वाले सोडून ऑफ लाईन वाल्यांना दिले कोविडचे डोस!

* समोरून कडक अन मागून सुरुग!

* ऑनलाईन का ऑफलाईन नागरिकांत संभ्रम! 

परळी वैजनाथ- (प्रतिनीधी) कोविड 19 च्या  लसीकरण मोहीम सुरू असून.परळी शहरात तीन ठिकाणी लसीकरण केंद्रावर  सध्या लस देणे सुरू आहे.

आज शहरासाठी 14 00 लस आल्या असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी मोरे यांनी दिली असून दुपारी 1 वाजेपर्यंत हा कोठा संपला असून लस घेण्यासाठी प्रत्येक लस केंद्रावर अजून शेकडीच्या रंगा लसीच्या प्रतीक्षेत तर सामाजिक अंतराचा फज्जा उडाल्याचे चित्र पाहवयास मिळत आहे.

शक्तीकुंज वसाहत या ठिकाणी वय 18 ते 44 यावयोगटांच्या नागरिकांना आज पासून लस देण्यास सुरुवात करण्यात आली असून याठिकाणी मात्र ऑनलाईन नोंदणी करणाऱ्यांना  वाऱ्यावर सोडण्यात आले आहे तर मागच्या दारातून तोंड बघून लस घेण्यास सोडले जात आहे. या केंद्रावर महिला सकाळी 8 वाजल्यापासून रांगेत उभे आहेत मात्र या महिलांना सुद्धा अध्यप लस दिली गेली नसल्यामुळे नागरिकांत नाराजी परसरली आहे.

प्रशासनाच्या गाईडलाइन ला या केंद्रावर केराची टोपली दाखवण्याचे काम केले जात असून मनमानी कारभार सुरू असून यावर लगाम घालण्याची गरज आहे.

याच केंद्रावर तोंड बघून सोडले जात असून लाईन  लावण्यचे सोंग का?असा सवाल जनतेतुन उपस्थिती होत आहे.

ऑनलाईन वाले तात्काळत दिवसभर उभे अन ऑफलाईन वाले मात्र लस घेऊन मोकळे होत आहेत मग ऑनलाईन नोंदनी चा काय फायदा? असा संतप्त सवाल लसघेण्यास आलेल्या नागरिकांतून उपस्थित होत आहे

प्रशासनाने तात्काळ  यावर उपाययोजना करून नागरिकांचे होत असलेले हाल थांबवावे असे नागरिकांतून मागणी होत असतांना दिसून येत आहे.

No comments:

Post a Comment