Thursday, May 20, 2021

अ‍ॅट्रोसिटीच्या गुन्हयांमध्ये मदत करण्यासाठी लाच घेतल्याप्रकरणी पोलिस उपविभागीय अधिकार्‍यासह 2 पोलिस कर्मचार्‍यांवर कारवाई.


पुणे ;-दाखल असलेल्या अ‍ॅट्रोसिटीच्या गुन्हयांमध्ये मदत करण्यासाठी 5 लाख रूपयांच्या लाचेची मागणी करून ताडजोडीअंती 3 लाख रूपये द्यायचे ठरले असताना 2 लाख रूपयांची लाच घेतल्याप्रकरणी जालना येथील पोलिस उपविभागीय अधिकार्‍यासह 2 पोलिस कर्मचार्‍यांवर पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (अ‍ॅन्टी करप्शन) कारवाई केली आहे. उपविभागीय अधिकारी जाळयात अडकल्याने राज्य पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.

सुधीर अशोक खिराडकर (वय.45, पोलीस उपविभागीय अधिकारी. जालना, जि. जालना.रा.प्लॅट नं.सी 202, ॠषीपार्क, अंबडचौकी, जालना), संतोष निरंजन अंभोरे (वय .45 वर्ष, पो.ना.246 नेम.कदिम पो.स्टे.

जालना. रा.पोलीस लाईन जालना) आणि विठ्ठल पुंजाराम खार्डे (पो.काॅ./162 नेम.एस.डी.पी.ओ.जालना कार्यालय, रा. मु.पो. कडवंचीवाडी ता.जि.जालना) अशी त्यांची नावे आहेत. उपाविभागीय अधिकारी खिराडकर आणि पोलिस कर्मचारी अंभोरे, खार्डे यांनी अ‍ॅट्रोसिटीच्या गुन्हयात मदत करण्यासाठी 5 लाख रूपयांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती 3 लाख रूपये द्यायचे ठरले होते. दरम्यान, आज (गुरूवार) 2 लाख रूपयाची लाच स्विकारताना पोलिस कर्मचारी संतोष निरंजन अंभोरे यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे

No comments:

Post a Comment