अंबाजोगाई (प्रतिनिधी);- बीड जिल्ह्यातील लोखंडीसावरगांव तालुका अंबाजोगाई येथे कोंबडी चा मुत्यु बर्ड फ्लू रोगाने मृत्यू झालेले आहेत. त्या अनुषंगाने सदर क्षेत्रास संसर्गगस्त क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात आले असून, संबंधीत गावांच्या 1-10 कि.मो. परिसरातील गावांना पुडील आदेशापर्यंत सतर्क क्षेत्र (Surveillance Zone) म्हणून घोषीत करण्यात येत असून, या गावांतिल कुक्कुट पक्षांची खरेदी-विक्री, वाहतूक, बाजार व जत्रा प्रदर्शन आयोजित करणे यास प्रतिबंध घालण्यास येत आहे. तसेच या बाबोसादी वरील सर्व गाव हे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून पुढील आदेशापर्यंत घोषीत करण्यात येत आहेत. तेथे निर्धारित प्रतिबंधक निर्देश लागू करण्याची कार्यवाही करण्यात आले आहे,
यासंदर्भात सामान्य नागरिकांमध्ये कोंबडीचा मृत्यू बाबत भितीचे वातावरण निर्माण होवू नये आपल्या भागात 1 किंवा 2 कावळे मृत पावल्यास घाबरून जावू नये, सदरौल मृत कावळे /कोंबड्या आढळून आल्यास ग्रामपंचायत नगरपंचायत यांचेशी व नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यांशी संपर्क साधावा. मृत कावळ्यांना उघड्या हाताने स्पर्श करु नये, मास्क वापरावा. तसंच सदरील भाग धुण्याच्या सोड्याने किंवा चुण्याने निर्जतूकिकरण करुन घ्यावा. कावळ्यांमध्ये जास्त प्रमाणात असाधारण मृत्यू आढळल्यास रोग निदानासाठी त्यांचे नमुने पाठविण्यात येतील.
मौजे लोखंडीसावरगांव पासून 0-1 कि.मी. च्या आतील लोखंडोसावरगांव शिवार हा संक्रमित क्षेत्र (Infected Zone) व 1-10 कि.मी.परिसरातील सनगांव,श्रीपतरायवाडी,वरपगांव,कोळकानडी ,डिघोळअंबा,कोद्री सातेफळ ,हिवराखुर्द,चनई,कुंबेफळ,माकेगांव, उमराई तसेच केज तालुक्यातील होळ, दिपेवडगांव.पळसखेडा,बोरीसावरगांव व कानडी बदन ता. अंबाजोगाई या गावांना पुढील आदेशापर्यंत सतर्क क्षेत्र (Surveillance Zone) म्हणून घोषीत करण्यात यावे. या गावांतील कुक्कुट पक्षांची खरेदी-विक्री, वाहतूक, बाजार व जत्रा प्रदर्शन आयोजित करणे यास पुढील आदेशापर्यंत प्रतिबंधीत क्षेत्रा म्हणून घोषीत करण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment