Saturday, January 2, 2021

विजय ऑफसेट अ‍ॅण्ड मल्टी सर्व्हिसेसचा मा.श्री.बाजीराव धर्मधिकारी यांच्या हास्ते शुभारंभ.



* डिजीटल ग्राफिक्स काळाची गरज ;- बाजीराव धर्मधिकारी .

परळी वैजनाथ (प्रतिनिधी) प्रिंटींग इंडस्ट्री मध्ये नेहमीच बदल होत असतात, काळानुसार असे चांगले बदल स्वीकारावे लागत असतात. हल्ली डिजीटल ग्राफिक्स आणि ऑफसेट प्रिंटींग काळाची गरज झाली असून युवकांचा अशा उद्योग व्यवसायाकडे कल वाढत असल्याचे पाहुन समाधान वाटते असे मत माजी नगराध्यक्ष बाजीरावभैय्या धर्माधिकारी यांनी व्यक्त केले.
परळी येथील विजय ऑफसेट अ‍ॅण्ड मल्टीसर्व्हिसेस या व्यवसायाचा शुभारंभ माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला. प्रसाद कुलकर्णी, गजानन कुलकर्णी, बालाजी कुलकर्णी यांनी या व्यवसायाची आज सुरूवात केली. कार्यक्रमास महिला महाविद्यालयाचे सचिव संजय देशमुख, दैनिक मराठवाडा साथीचे संपादक सतिश बियाणी, पापासेठ भाटीया,  रबजीतसिंग भाटीया, अनिल लाहोटी, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. ऑफसेट प्रिंटींग सोबत विविध मल्टीसर्व्हिसेस येथे उपलब्ध करून दिले असून एकाच छताखाली मनी ट्रान्सफर, पॅनकार्ड, आधारकार्ड, पिक विमा, लाईटबील, कलर झेरॉक्स, लॅमीनेशन, निमंत्रण पत्रिका, फ्लेक्स बॅनर प्रिंटींग अशा अनेक सुविधा येथे उपलब्ध करून दिल्याचे प्रसाद कुलकर्णी यांनी सांगितले. यावेळी मान्यवरांचे स्वागत कुलकर्णी परिवाराच्या वतिने करण्यात आले.

No comments:

Post a Comment