Saturday, January 9, 2021

अवैध वाळु वाहातुक करणारे दोन टॕक्टर ताब्यात स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई .


बीड (प्रतिनीधी)- सध्या वाळू माफियाने उच्छाद् मांडला असून जिल्ह्यात एकही शासकीय टेंडर नसताना सर्रासपणे नदी पात्रातील वाळुचा उपसा होतोय. बीड ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीतून अवैध वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर स्थानीक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले.
तांदळवाडी शिवारातील तुपे वस्ती जवळ अवैध वाळू वाहतूक करणारे एक ट्रॅक्टर पोलिसांनी पकडले. त्यामध्ये एक ब्रास वाळू होती. चालक प्रदीप भास्कर रकटे (रा. आहेर चिंचोली) याला ट्रॅक्टरसह पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्यावर ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल केला आहे तर दुसरी कारवाई पेंडगाव ते तांदळवाडी या रोडवर एक ट्रॅक्टर पकडला. त्यातही एक ब्रास वाळू होती. चालक भाऊसाहेब रामनाथ यमगर (रा. शहाजानपूर (ता. गेवराई) याला ट्रॅक्टरसह पोलिसांनी ताब्यात घेत त्याच्यावरही बीड ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सदरील कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पीआय भारत राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय विजय गोसावी, हवालदार खेडकर, पोलिस नाईक कदम, गायकवाड, शिंदे, दुबाले, हरके यांनी केली.

No comments:

Post a Comment