Thursday, January 7, 2021

भाजपची राष्ट्रवादीला मदत.परळी पंचायत समिती सभापतीवर अविश्वास ठराव पारित !!

बीड -एरवी ग्रामपंचायत असो की लोकसभा, विधानसभा निवडणूक एकमेकांच्या विरोधात मैदानात उतरणारे धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या बहीण भावाने पंचायत समिती सभापती वरील अविश्वास ठरावाच्या वेळी मात्र एकमेकाला मदत केल्याचे चित्र पहावयास मिळाले .भाजपच्या दोन सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस ला मदत करीत विद्यमान सभापती उर्मिला गित्ते यांच्यावर एक विरुद्ध दहा असा अविश्वास ठराव पारित केला .यामध्ये महत्वाची भूमिका ठरली ती गटविकास अधिकारी संजय केंद्रे यांची,कारण त्यांनीच हा सगळा मेळ जमवत आणून अधिकाऱ्यांशी खेटाल तर पदाला मुकाल हा संदेश देखील दिला आहे .

परळी पंचायत समितीच्या सभापती उर्मिला गित्ते यांनी गटविकास अधिकारी संजय केंद्रे यांनी नरेगा मध्ये केलेल्या भ्रष्टाचार प्रकरणी तक्रारी केल्या होत्या,त्यानंतर केंद्रे यांनी भाजपच्या तीन व इतर एक अशा चार सदस्यांना संपर्क करीत थेट सभापती गित्ते यांच्यावरच अविश्वास ठराव दाखल करण्याचा प्रकार केला .

विशेष बाब म्हणजे अविश्वास ठरावावर मतदान किंवा चर्चा करण्याची वेळ ही दुपारी एक वाजताची होती मात्र संबंधित यंत्रणेने नियम पायदळी तुडवत अक्षरशः दुपारी अकरा वाजताच अविश्वास ठराव दाखल करून घेत मतदान प्रक्रिया पार पाडून घेतली .

स्वतः कुठेही पुढे किंवा पडद्यासमोर न येता परळी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय केंद्रे यांनी सभापती उर्मिला गित्ते यांच्यावर दाखल केलेला अविश्वास ठराव गुरुवारी पारित झाला .स्वतःचे धंदे उघड होऊ नयेतं म्हणून एका अधिकाऱ्याने राजकीय क्षेत्रात पदाधिकाऱ्याला पदच्युत करण्याचा हा पहिलाच प्रसंग असेल .रवी एकमेकाला राजकीय आखाड्यात पाण्यात पाहणारे मुंडे बहीण भाऊ या अविश्वास प्रकरणात मात्र एकत्र आल्याचे दिसून आले .भाजपच्या दोन सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांना मदत करीत गित्ते यांच्यावरील अविश्वास ठरावाच्या बाजूने मदत केली .यामुळे परळीत एक नवे समीकरण पाहायला मिळाले .


No comments:

Post a Comment