Saturday, January 16, 2021

परळी वैजनाथ पंचायत समितीच्या सभापती निवडीसाठी गुरुवारी विशेष सभा.


परळी वैजनाथ (प्रतिनीधी) परळी पंचायत समितीच्या सभापती निवडीसाठी गुरुवार दि.21जानेवारी रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे अविश्वास ठरावामुळे रिक्त झालेल्या जागे करिता हि विशेषसभा जिल्हाधिकारी बीड यांच्या सुचनेनुसार आयोजित करण्यात आली आहे.

परळी पंचायत समितीच्या सभापती सौ.उर्मिला बबनभाऊ गिते यांच्यावर 7 जानेवारीला अविश्वास ठराव मंजुर झाल्यानंतर सभापतींच्या रिक्त जागेचा निवडणूक कार्यक्रम जिल्हाधिकारी बीड यांनी जाहिर केला आहे या नुसार गुरुवार दि.21 रोजी दुपारी 2 वाजता पं स सभागृहात सदस्यांच्या विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे पिठासीन अधिकारी म्हणुन कामकाज पाहतील.पंचायत समितीवर ना.धनंजय मुंडेंचे वर्चस्व असुन त्यांच्या सुचनेनुसारच नव्या सभापतीची निवड होणार हे निश्चित.

No comments:

Post a Comment