परळी वैजनाथ ;- परळी तालुक्यातील 7 ग्रामपंचायतीची निवडणूक 15 जानेवारीला पारपडली होती.या निवडणुकीची मतमोजणी सोमवार दि.18 रोजी सकाळी 10 वाजल्या पासुन तहसील कार्यालय परळी येथे केली जाणार आहे.57 सदस्यांचे भवितव्य पणाला लागले आहे.
ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2021 परळी तालुक्यातील 7 ग्रामपंचायत मतदान पारपडले होते याची मतमोजणी सोमवारी सकाळी 10 वाजल्या पासुन मतमोजणीसाठी टेबल संख्या 4 व एकूण फेऱ्या 2 असणार आहेत.मतमोजणी साठी नियुक्त कर्मचारी 16 नियुक्त करण्यात आले आहेत.
परळी तालुक्यातील मोहा, सरफराजपूर, वंजारवाडी, लाडझरी, भोपला, रेवली, गडदेवाडी या सात ग्रामपंचायतींसाठी मतदान प्रक्रिया पारपडली होती. तालुक्यातील मोहा ग्रामपंचायत 11 जागांसाठी 25 उमेदवार, गडदेवाडी 7 जागांसाठी 15 उमेदवार, सरफराजपूर 7 जागांसाठी 14 उमेदवार, रेवली 9 पैकी 8 जागा बिनविरोध झाल्या असून एका जागेसाठी 2 उमेदवार रिंगणात आहेत. भोपला येथे 7 जागांसाठी 14 उमेदवार, वंजारवाडी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाली आहे तर लाडझरीत 9 जागांसाठी 22 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. 07 ग्रामपंचायतच्या एकूण 57 जागांसाठी मतदान प्रक्रीया पारपडली होती.
No comments:
Post a Comment