परळी वैजनाथ (प्रतिनिधी) सेवानिवृत्त मुख्याध्यापक माणिकआप्पा नरहरीअप्पा चौंडे यांचे बुधवार दिनांक 16 जानेवारी रोजी रात्री 11 वा. हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले आहे.
परळी शहरातील नांदूरवेस गल्ली भागातील रहिवाशी तथा सेवानिवृत्त मुख्याध्यापक माणिकआप्पा चौंडे यांचे 6 जानेवारी रोजी रात्री निधन झाले. मृत्युसमयी ते 70 वर्ष वयाचे होते. परळी येथील आदर्श शिक्षक मनोज चौंडे व औष्णिक विद्युत केंद्रातील पोस्ट ऑफिसचे पोस्ट मास्तर महेश चौंडे यांचे ते वडील होत. माणिक आप्पा चौंडे हे धार्मिक प्रवृत्तीचे असल्याने सर्व परिचित होते. वीरशैव समाजाच्या विविध कार्यक्रमात ते सक्रिय सहभागी असत. दरम्यान माणिकआप्पा चौंडे यांच्या पार्थिवावर आज गुरुवार दिनांक 7 जानेवारी रोजी वीरशैव स्मशानभूमी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यविधी करण्यात आले. चौडे परिवारावर कोसळलेल्या दुःखात दैनिक कांतीकारी साथी परिवार सहभागी आहे.
No comments:
Post a Comment