Thursday, January 14, 2021

परळीच्या बसस्थानकाचे काम सत्ताधारी सरकार बीओटी तत्वावर करणार.


 "* सत्ता बदल झाल्यावर विकासात्मक का गोठवली जातात हे दुर्देव्य. मग, मागचा 5कोटी 45लाखांचा मंजुर निधी गेला कुठे! "*

परळी वैजनाथ -(प्रतिनिधी)परळीच्या बसस्थानक परिसरात मजबुत डांबरीकरण करण्यात यावे, प्रवाशांसाठी सुविधा उपलब्ध कराव्यात या मागणीसाठी मागील दोन वर्षापासुन पत्रकार संघाने व विविध राजकिय पक्षाने आंदोलने, उपोषणे केली. परंतु तात्पुरते लेखी आश्‍वासन देऊन आंदोलन कर्त्यांची केवळ समज काढण्यात आली.आश्वासने देणारे अधिकारी बदलले परंतु या दोन वर्षात आश्‍वासना पलिकडे परळी बसस्थानकास काहीच साध्य झाले नसल्याने बसस्थानकाची दुराअवस्था अजुन जशात तशीच आहे.
परळीच्या बसस्थानकात असलेल्या असुविधा व बसस्थानकातील खड्डयामुळे प्रवाशांना होत असलेल्या त्रासाबद्दल 2017 पासुन वेगवेगळे राजकिय पक्ष व सामाजिक कार्यकर्त्यांकडुन निवेदने देवुन मागण्यां करण्यात आल्या होत्या. परळी बसस्थानकाच्या बकाल व्यवस्थे विरुध्द परळी पत्रकार संघ,राष्ट्रवादी काँग्रेस,महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने निवेदने देण्यात आली होती. परळीचे बसस्थानक गैरसोईचे झाले असुन व प्रवाशांचे होत असलेले हाल आणि दुर्गधीं मुळे होत असलेला त्रास याकडे परिवहन महामंडळाने दुर्लक्ष केल्याने 2017 साली राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांनी बसस्थानक परिसरातील खड्डयात साचलेल्या पाण्यामध्ये बदके सोडुन अभिनव पध्दतीने आंदोलन केले होते. तसेच त्याआधी सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार प्रेमनाथ कदम यांनी 25 जानेवारी2017 रोजी एक दिवसीय उपोषण केले होते. यावेळी तत्कालीन आगारप्रमुख चौरे व विभागीय अभियंता कमलाकर कानेकर या अधिकार्‍यांनी परळी बसस्थानकात मजबुत डांबरीकरण करुन स्वच्छते बरोबरच इतर सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील, असे आश्‍वासन दिले होते.आश्वासने देणारे अधिकारी बदलले परंतु परळी बसस्थानकातील खड्डे मात्र जैसे थे च राहिले. या संदर्भात मागील वर्षी सन 2018 साली परळी बसस्थानकाचे नुतनीकरण करणे सर्वत्र डांबरीकरण करणे , प्रवाशांसाठीच्यां व एस, टी, कर्मचाऱ्यांच्यासाठी सुखसोयी उपलब्ध करून अत्याधुनिक असे परळीचे बसस्थानक करण्यासाठी पालकमंत्री ना.पंकजा मुंडे यांनी महाराष्ट्र परिवहन मंत्री ना.दिवाकर रावते यांच्या कडे पाठपुरावा करून प्रस्ताव मंजुर करून निधी सुद्या मंजुर करून घेतला होता व सदर बसस्थानकाच्या कामाची निविदा निघुन त्याचे उदघाटन खासदार प्रितम मुंडे यांनी केले होते परंतु महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन झाले व सदर कामाचे श्रेय मागच्यांना मिळु नये म्हणुन परळी बसस्थानकाच्या आराखड्यात त्रुटी दाखवत बसस्थानकाच्या कामाला स्थगिती देण्याचा राजकारणी डाव खेळला गेला व हे काम बीओटी तत्वावर करण्यात येणार असे विद्यमान बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.धनंजय मुंडे यांनी प्रसारमाध्यमांना मागेच स्पष्टीकरण दिले होते .मग प्रश्र असा पडतो की मागच्या सरकाराने परळीच्या बसस्थानकाच्या नुतनीकरणासाठीचा मंजुर झालेला 5कोटी 45लाखांचा निधी कुठे गेला व या सरकारने किती निधी मंजुर केला हे काम कधी सुरू होणार हे परळीतील प्रवाशी जनतेला महाराष्ट्र परिवहन मंडळाचे मंत्री ना.अनिल परब यांनी स्पष्टीकरण करणे गरजेचे असल्याचे परळीकरांना वाटत आहे.तर लवकरच परळी बसस्थानकाच्या नुतनिकरणासाठी
होणारी चालढकल या पुढे परळीतील जनता सहन करणार नसुन लवकरच या प्रश्नावर जनरेट्याच्या माध्यमातुन हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी एक मोठे आंदोलन आमच्या वतीने केले जाईल असे परळीतील नागरिक चौका,चौका चर्चा करतांना दिसुन येत आहे.

No comments:

Post a Comment